विश्वमंगल मराठी फाऊंडेशन
मराठी भाषा, संस्कृती आणि समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन झालेली संस्था
मा. आमदार श्री. सुभाष बापू देशमुख
लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक मा. आमदार श्री. सुभाष बापू देशमुख यांनी विश्वमंगल मराठी फाऊंडेशनची स्थापना मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केली आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते जनतेची सेवा करत आहेत. शिस्त, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक जबाबदारी या मूल्यांवर वाढलेल्या देशमुख साहेबांनी वारी परंपरेच्या संस्कारात जीवन जगत सामाजिक कार्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
"झेंडा मराठीचा, मराठी भाषेचा, मराठी कर्तृत्वाचा"
वचन: मराठी भाषा व मराठी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे
विश्वमंगल मराठी फाऊंडेशनची रचना
संस्थेची संपूर्ण रचना — थेट आमच्या माहितीपत्रकातून
मा. आमदार श्री. सुभाष बापू देशमुख — संल्पनेचे प्रणेते व संस्थापक
सदस्य संख्या: १० — जागतिक पातळीवर धोरण ठरवणारी सर्वोच्च समिती
सदस्य संख्या प्रत्येकी: ०५ — परदेशातील मराठी समाजाशी समन्वय
०६ विभागीय समित्या — प्रत्येक विभागासाठी १० सदस्य
विश्वमंगल मराठी फाऊंडेशनची पाच उद्दिष्टे
संस्थेच्या मूळ दस्तऐवजातून — पाच मुख्य उद्दिष्टे
मराठी संस्कृती, मराठी भाषा, शिक्षण, उद्योग, युवा आणि सामाजिक क्षेत्र यासारख्या विषयांवर विविध उपक्रम, परिषद, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे.
जगभरातील मराठी उद्योजकांना मराठी मायभूमीमध्ये उद्योग उभारणीस प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दौऱ्यांचे नियोजन करणे.
महाराष्ट्रातील नव उद्योजकांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणे — स्थानिक उद्योजकांना जागतिक संधी उपलब्ध करून देणे.
महाराष्ट्रातील मराठी शाळांना नवी उभारी देण्यासाठी विविध मराठी उद्योजक/संस्थांमार्फत शाळा दत्तक योजना राबवणे.
जागतिक पातळीवरून महाराष्ट्रामध्ये उद्योग/धंदे उभे करू इच्छिणाऱ्या उद्योजक व महाराष्ट्रातील स्टार्ट अप/नव उद्योजकांमध्ये समन्वयक व मार्गदर्शकाची भूमिका पार पाडणे.
Vishwamangal Marathi Foundation
आमची कार्यपद्धती
पारदर्शक, उत्तरदायी व सहभागात्मक कार्यप्रणालीचा अवलंब
डिजिटल माध्यमातून जागतिक स्तरावर संपर्क व समन्वय प्रस्थापित करणे.
देश विदेशातील विविध विद्यमान महाराष्ट्र मंडळे व इतर संस्थांशी समन्वय व सहकार्य प्रस्थापित करणे.
पारदर्शक, उत्तरदायी व सहभागात्मक कार्यप्रणालीचा अवलंब करणे.
विविध क्षेत्रातील तज्ञांचे सल्लागार मंडळ स्थापन करणे व डिजिटल माध्यमातून जागतिक स्तरावर समन्वय प्रस्थापित करणे.
विश्वमंगल मराठी फाऊंडेशनशी जोडले जा
मराठी भाषा, संस्कृती आणि समाजाच्या उन्नतीसाठी आजच सदस्य व्हा